"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"
केडगांव ( वार्ताहर): केडगांव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. 12 ऑगस्ट रोजी भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये इस्रोसंबंधीच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. याप्रसंगी प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की , भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचा विकास ज्या पद्धतीने झाला, त्यामध्ये विक्रम साराभाई यांनी पायाभूत योगदान दिले. विद्यार्थ्यांनी भारतीय संशोधकांचा आदर्श घेऊन संशोधन क्षेत्रात आपले सक्रिय योगदान दिले पाहिजे. महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाद्वारे 2 ऑगस्ट रोजी भारतीय औषध निर्मिती शास्त्राचे जनक सर प्रफुलचंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुद्धा कार्यक्रमाचे अध्यक्...