"पुरस्कार सर्वांची उमेद वाढविणारे हवे, कुणाला नाऊमेद करणारे नसावे"- डॉ.अनिल काकोडकर

पुणे (वार्ताहर):
       " चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक म्हणजे पुरस्कार देणे , ही कौतुकाची बाब आहे. पुरस्कारातून इतरांना प्रेरणा मिळते. मात्र पुरस्कार सर्वांची उमेद वाढविणारे हवे, कुणाला नाऊमेद करणारे नसावे. "असे मत अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
          अंबादास टल्लू फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील पद्‌द्मभूषण व पद्मश्री पुरस्कार प्राप्त थोर व्यक्तींचा गौरव यापूर्वी पद्म पुरस्कार मिळालेल्या थोरांच्या हस्ते करण्यात आला. हा समारंभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे
म्हणून पद्‌मश्री कुमार केतकर तर अध्यक्षस्थानी
पद्‌मविभूषण डॉ. अनिल काकोडकर हे होते.
          याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल काकोडकर
 म्हणाले की, "पद्म पुरस्कार मिळवणा-यांशी जवळीक साधण्याचा अंबादास टल्लू फाऊंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाज किती प्रगल्भ आहे याची मोजदाद करतांना इंन्स्टीट्यूशन (संस्था), इन्फ्रास्ट्रक्टर (सोयी सुविधा) , इनसेन्टीव्ह (प्रोत्साहन) आणि टेक्नॉलाजी (तंत्रज्ञान) या चार गोष्टी कायम लक्षात ठेवाव्यात.
या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या त्याग, सेवा, कार्यकर्तृत्वाच्या प्रोत्साहनावर होत असतो. आरोग्य, शिक्षण यामध्ये समाजाला प्रेरक व उपकारक वर्तन असावे, असमानता असू नये" , असेही डॉ. काकोडकर म्हणाले,
          पद्मश्री ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले की,  पद्म
पुरस्कारार्थी आपआपल्या कार्यात सर्वश्रेष्ठ कामगिरी करतात. त्यांचा यथोचित गौरव ही आनंदाची बाब आहे. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते.
              याप्रसंगी पद्म पुरस्कार प्राप्त झालेले व कार्यक्रमास
उपस्थित असलेले सन्माननीय श्री. उदय विश्वनाथ देशपांडे ( क्रीडा ), मनोहर कृष्णा डोळे(औषधे), श्री. झहीर काझी (साहित्य आणि शिक्षण) यांचा शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी आणि स्मृतीचिन्ह देऊन
अंबादास टल्लू  फाऊंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.
या तिन्ही थोर पुरस्कारार्थीने आपल्या क्षेत्रातील कार्याचे सविस्तर विवेचन केले. तसेच फाऊंडेशन बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
       या प्रारंभी अंबादास टल्लू फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा टल्लू  यांनी स्वागत केले. यानंतर प्रास्ताविक भाषणात त्या म्हणाल्या की, "अंबादास टल्लू फाऊंडेशन ही आरोग्य, शिक्षण व पर्यावरण या क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था आहे. विविध सन्माननीय पद्म गौरव पुरस्कार विजेत्यांचा गौरव सत्कार करणारी एकमेव सामाजिक संस्था असून या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे .
  विशेष उल्लेख करायचा तर महाराष्ट्रातील ६ व्यक्तींना पद्‌द्मभूषण व ६ व्यक्तींना पद्‌द्मश्री पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारार्थीना आम्ही व्यक्तिश: भेटून आमंत्रित केले.
विशेष बाब म्हणजे सत्कारमूर्ती पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे  हे वय वर्षे 96असून सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले.
संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा टल्लू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
"अंबादास टल्लू फाउंडेशन"च्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद करत त्यांनी संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला .
इस्रोचे डायरेक्टर डॉक्टर सुरेश नाईक व पुण्यतील नवनिर्वाचित खासदार सौ.मेधा कुलकर्णी यांच्यासह कॉसमॉस बँकेचे सीएमडी व सी ए श्री.मिलिंद काळे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते त्यांचा  सत्कार करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .श्री चित्तरंजन भागवत , डॉक्टर अरविंद नेरकर श्री व सौ सचिन टेकाळे , श्री व सौ हवेली , स्वाती कुलकर्णी दिपाली अकोलकर श्री. सुधीर करंदीकर, सौ.प्रतिभा करंदीकर, मानसी गोडबोले , सिद्धांत देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर  नागरिक पुरुष व महिला हे मोठ्या संख्येने उपस्थित होते .
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा हवेली,रेवती सौदीकर यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली .
         कार्यक्रमाच्या शेवटी  डॉक्टर प्रशांत मंजिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व केतकी देशपांडे यांच्या पसायदानाने महाराष्ट्रातील एकमेव अशा या उत्तुंग सोहळ्याची सांगता झाली.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "