अंबादास टल्लु फाउंडेशनच्या वतीने बुधवार,दिनांक 27 मार्च 2024 रोजी "प्रकट मुलाखत आणि शास्त्रीय संगीताची सुश्राव्य मैफल"
पुणे( वार्ताहर):
अंबादास टल्लु फाउंडेशन (रजि.) पुणे - ५१ यांच्या वतीने चुकवू नये अशी "प्रकट मुलाखत आणि शास्त्रीय संगीताची सुश्राव्य झलक मैफल" बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी, सायंकाळी 05:00 ते 07:00 या वेळेत, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे, 'न्यू इंग्लिश स्कूल' येथील, 'गणेश सभागृह', टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
या मैफलीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त , भारतीय परंपरेच्या शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे, ज्येष्ठ दिग्गज व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांची एकमेवाद्वितीय अशी उत्कट व थेट प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
ही मुलाखत भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रेमी व गाढे अभ्यासक सर्वश्री श्री. मुकुंद संगोराम (लोकसत्ता या सुप्रसिद्ध मराठी दैनिक वृत्तपत्राचे नामवंत ज्येष्ठ संपादक) हे स्वतः घेणार असून या कार्यक्रमाचे निवेदन श्री आनंद देशमुख ( सवाई गंधर्व फेम ) हे करणार आहेत.
या प्रकट मुलाखतीचा अविस्मरणीय असा प्रत्यक्ष सोहळा, 'न भूतो न भविष्यती' असाच होणार असून या कार्यक्रमासाठी सुरमणी पं. डॉ. कमलाकर परळीकर यांची
विशेष सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे . तबल्यावर साथ संदीप मुखर्जी यांची असून उमेश पुरोहित यांची साथ हार्मोनियम वर असणार आहे .
हा सोहळा 'याचि देहि, याचि डोळा' बघण्यासाठी व अनुभवण्यासाठी अंबादास टल्लु फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा अंबादास टल्लु यांनी रसिकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाच्या संयोजन समितीमध्ये धनंजय जोशी , चारुशीला बेलसरे ( सुप्रसिद्ध सुगम संगीत गायिका ) , कल्याणजी गायकवाड ( सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडचे वडील ) , सुरंजन खंडाळकर , विश्राम परळीकर , शुभदा देशपांडे , मधुरा गुर्जर ,केतकी देशपांडे , प्रमोद कुलकर्णी , नेहा हवेली ,स्वाती कुलकर्णी , वैशाली डोणगावकर , आनंद चीतानंद यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी संस्थच्या खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
अंबादास टल्लु फाउंडेशन,पुणे 51.
संपर्क क्रमांक: 8788079190