"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात 'अर्थशास्त्रातील करिअर' यावरील व्याख्यानसत्र संपन्न "

केडगाव(वार्ताहर) :
              सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव येथे अर्थशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पर्धा परीक्षा आणि रोजगार संधी या विषयावर प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानांतर्गत व्याख्यात्या कु.रश्मी शितोळे यांनी स्पर्धा परीक्षा रोजगार संधी या विषयावर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. कु.रश्मी शितोळे या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा अर्थात IES परीक्षेत २०२४ मध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेषतः त्यांनी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा या परीक्षेमध्ये उपलब्ध संधी, अभ्यासपद्धती,आव्हाने, अभ्यासक्रम आणि मुलाखत तंत्र या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. टी. के. शेख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आर.एन.गायकवाड उपस्थित होते.

तसेच एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. व्ही.शितोळे यांनी नवीन शैक्षणिक धोरण संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख डॉ.ए.बी. दिवेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. बी.डी. गव्हाणे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. बी.पी. दरेकर,हिंदी विभागप्रमुख डॉ.एन.एच.जावळे, कला शाखाप्रमुख डॉ.अनुराधा गुजर, ग्रंथपाल डॉ. मनीषा जाधव सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि ८५ विद्यार्थी उपस्थित होते.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.जी.थोपटे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. एस.एल.वासनीकर, अतिथी परिचय प्रा.गणेश गायकवाड यांनी केला आणि आभार प्रदर्शन प्रा.अमर नांदगुडे यांनी केले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "