बिंदास जिंदगी फाऊंडेशनच्या ‘पोलीस–जनता संवाद’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : संवादासोबत आरोग्य आणि माणुसकीचा जागर
पुणे | दि. १० सप्टेंबर २०२६ बिंदास जिंदगी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘ पोलीस–जनता संवाद ’ हा उपक्रम गुरुवारी पुणे पोलीस मुख्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पोलीस तसेच पोलिसेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या उपक्रमातून संवाद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर . सुजाता नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित या शिबिरात उपस्थित पोलीस व पोलिसेतर कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू कर्मचाऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. दिवसरात्र कर्तव्य बजावताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. ‘संवादासोबत आरोग्य आणि आरोग्यासोबत माणुसकी’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणत फाऊंडेशनने सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. पोलीस आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, परस्परांमध्ये विश्वास व ...