"माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी येथे विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न"
सराफवाडी ( वार्ताहर) :
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी या विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण ,रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वनौषधी वनस्पती यांचे प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. नारायणदास रामदास हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,इंदापूरचे प्राचार्य सन्माननीय श्री.सोरटे सर यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले विद्यालय,बिजवडी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री. फलफले सर यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय कदम सर यांनी केले.त्यांनी यावेळी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. जगदाळे सर यांनी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर अतिशय सुंदर अशा भाषेत मांडला.
प्रमुख पाहुणे श्री. फलफले सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला वाव मिळून विद्यार्थी क्रियाशील होतात.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. सोरटे सर म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उपजत असणाऱ्या बौद्धिक क्षमतेला विज्ञान प्रदर्शनासारख्या उपक्रमांमुळे वाव मिळतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. काळेल सर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती. बरळ मॅडम यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनाच्या परीक्षणाची जबाबदारी श्री. नारायणदास रामदास हायस्कूलमधील विज्ञान शिक्षिका श्रीमती शिंदे मॅडम यांनी पार पाडली.
या सर्व उपक्रमांचे नियोजन मुख्याध्यापक श्री.कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक श्री.नलवडे सर तसेच त्यांचे सहकारी श्री. फडतरे सर, श्रीमती बरळ मॅडम आणि इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
...............