" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची भविष्यवेधी वाटचाल कौतुकास्पद: उपशिक्षणाधिकारी मा.श्री. हेमंतकुमार खाडे "


शिरवळ( वार्ताहर):- 
      शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी प्रशालेने स्टेम (STEM) प्रयोगशाळेची केलेली उभारणी म्हणजे शाळेची भविष्यातील आव्हाने विचारात घेऊन केलेली कौतुकास्पद वाटचाल असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी मा.श्री. हेमंतकुमार खाडे यांनी केले. प्रशालेने उभारलेल्या या प्रयोगशाळेची पाहणी त्यांनी केली व उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या कौशल्यांची चाचपणी केली. यावेळी ते म्हणाले की, 'या स्टेम प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान,तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित यासंबंधीच्या संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे पडताळणी करण्याची संधी मिळते.तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग यांसारख्या विषयांची ओळख विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच करून देण्याचे महत्त्वाचे कार्य या स्टेम प्रयोगशाळांमुळे घडत आहे.'
 खंडाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.गजानन आडे यांनी प्रशाला राबवत असलेल्या विविध उपक्रमांची यावेळी प्रशंसा केली. कांचन ननावरे मॅडम यांनी देखील प्रशालेतील शालेय वातावरणाचे कौतुक करून प्रशालेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
यावेळी या स्टेम (STEM) प्रयोगशाळेच्या पाहणीसाठी श्री.अमोल पवार (एफ.डी.ए.,जि.प. सातारा), प्रा.टी.आर.तुवर (वाय.सी.ज्यु. कॉलेज, सातारा),सौ.के.एम. जाधव ( उपशिक्षक, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा) हे उपस्थित होते.
  या स्टेम प्रयोगशाळेची उभारणी करणाऱ्या व 120 देशांत कार्यरत असणाऱ्या EdgeFx कंपनीच्या कार्याचा परिचय समन्वयक श्री. मनोज यादव यांनी करून दिला तर स्टेम विषयाच्या शिक्षिका सूर्यवंशी मॅडम यांनी प्रयोगशाळेची उपस्थितांना ओळख करून दिली.
     प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. रमेश देशपांडे सर यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शोभा क्षीरसागर यांनी कडून दिला. याप्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना कदम, इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शितल माने या उपस्थित होत्या.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "