बिंदास जिंदगी फाऊंडेशनच्या ‘पोलीस–जनता संवाद’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद : संवादासोबत आरोग्य आणि माणुसकीचा जागर

पुणे | दि. १० सप्टेंबर २०२६

बिंदास जिंदगी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘पोलीस–जनता संवाद’ हा उपक्रम गुरुवारी पुणे पोलीस मुख्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पोलीस तसेच पोलिसेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या उपक्रमातून संवाद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर. सुजाता नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित या शिबिरात उपस्थित पोलीस व पोलिसेतर कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू कर्मचाऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
दिवसरात्र कर्तव्य बजावताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. ‘संवादासोबत आरोग्य आणि आरोग्यासोबत माणुसकी’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणत फाऊंडेशनने सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
पोलीस आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, परस्परांमध्ये विश्वास व आपुलकी वाढावी आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, या उद्देशाने अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

“पोलीस बांधव समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या कर्तव्याला सलाम करताना त्यांच्या आरोग्याची आणि माणुसकीचीही काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन अमित चव्हाण, संस्थापक, बिंदास जिंदगी फाऊंडेशन यांनी केले.

या उपक्रमातून सेवा, संवाद, आरोग्य आणि माणुसकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

'आजी: कुटुंबाचं आगळ' पाठ झाला जिवंत! कोथरूडच्या महेश विद्यालयातील उपक्रमाने जिंकली सर्वांची मने

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "