"ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय मानक संस्थेने मानांकित केलेल्या वस्तूंचाच वापर करावा -श्रीमती सुनिता नागरे"
पिंपळगाव बसवंत ( वार्ताहर) :
भारतीय मानक ब्यूरो ही भारत देशामधील प्रमाणे ठरवणारी एक सरकारी संस्था असून केंद्र सरकारने ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय मानक संस्थेची स्थापना केली आहे, असे प्रतिपादन नाशिक विभागाच्या संचालिका श्रीमती सुनिता नागरे यांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मानक मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले .
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, प्रा. भगवान कडलग, प्रा. सचिन कुशारे, श्री. सुरज विश्वकर्मा, प्रा. धनंजय कडलग, प्रा. प्रियंका निकम, प्रा. राणी जगताप आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ग्राहकांचे फसवणुकीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूची गुणवत्तेची पडताळणी करूनच वस्तू खरेदी करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन कुशारे यांनी केले, तर आभार प्रा. भगवान कडलग यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय कडलग, प्रा.तुषार मोरे, प्रा. अमोल वाकडे, प्रा.अनंत कर्डेल, प्रा. स्वप्निल केंदळे, प्रा. संदीप काळे, प्रा. विक्रम जाधव, प्रा. मंगेश जमदाडे, श्री. बाळा गांगुर्डे यांनी मेहनत घेतली.