" राज्यस्तरीय काव्यवाचन व्हिडीओ स्पर्धा २०२६ चा निकाल जाहीर : सोलापूरच्या सोनाली मुकणे गायकवाड ठरल्या महाविजेत्या "


            प्रज्ञासूर्य फाउंडेशन व WeAIMitra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन व्हिडीओ स्पर्धा – २०२६ चा बहुप्रतीक्षित निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट काव्यवाचन कौशल्याची प्रभावी छाप पाडली. स्पर्धेतील प्रत्येक व्हिडीओचे परीक्षकांनी उच्चारशुद्धता, सादरीकरणाची शैली, भावाभिव्यक्ती, आवाजातील चढ-उतार, आत्मविश्वास आणि एकूण प्रभाव या निकषांवर सखोल परीक्षण करून अंतिम निकाल निश्चित केला.
विजेते पुढीलप्रमाणे :
1. महाविजेते :- मा. सोनाली मुकणे गायकवाड, सोलापूर
2. विजेते :- मा. गौरी अनिकेत धबडे, ठाणे.
3. उपविजेते :- मा. पूजा उदयसिंग भोसले, कोल्हापूर
तसेच विशेष सन्मान प्राप्त स्पर्धक:
1. मा. वैशाली प्रवीण शिंदे, जालना
2. मा. दिपीका रामदास बाचल, शिरगाव
3. मा. महेश रामनाथ वैजापूरकर
4. मा. वेदिका विनायक बेंडूगडे, सांगली
5. मा. वैशाली चांदेकर, बदलापूर
       या स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी आयोजकांनी सांगितले की, स्पर्धेचा निकाल वेळेत तयार झाला होता; मात्र प्रत्येक स्पर्धकाला अचूक, आकर्षक आणि दर्जेदार प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रमाणपत्र निर्मितीची अंतिम प्रक्रिया सुरू असल्याने निकाल जाहीर करण्यात आला असून या स्पर्धकांचे प्रज्ञासुर्य फाउंडेशन चे founder, मा. सचिन राजपूत यांच्यासह, WeAimitra चे founder मा. निलेश राजपूत यांनीही अभिनंदन व्यक्त केले. यापुढील काळातही साहित्य, कविता आणि मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी अशा दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रज्ञासूर्य फाउंडेशन व WeAIMitra यांनी स्पष्ट केले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"