"केतकेश्वर विद्यालयात नरसिंह प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप"
निमगांव केतकी ( वार्ताहर):-
श्री. केतकेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज निमगांव केतकी येथे नरसिंह प्रतिष्ठान आयोजित सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत गरजू मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मा.श्री. रवींद्र (आण्णा) माळवदकर उपस्थित होते. तसेच त्यांच्या समवेत श्री. दत्तात्रय (आण्णा) चांदणे, सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन व नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मच्छिंद्र (आप्पा) चांदणे, पतसंस्थेचे संचालक श्री. भीमराव बोराटे, श्री. किरण चांदणे, जनहित पतसंस्थेचे चेअरमन अस्लम मुलाणी, शिवराज माळवदकर, विद्यालयाचे प्राचार्य श्री. चव्हाण सर, सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार श्री. मनोहर (नाना) चांदणे, श्री. दशरथ बनकर, श्री. महादेव शेंडे तसेच सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. वैष्णवी चांदणे, सौ. भारती मोरे, सौ. प्रियांका बारवकर, विद्यालयाचे सर्व शिक्षक - शिक्षिका इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलींना दप्तर व गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रवींद्र (आण्णा) माळवदकर, श्री. मच्छिंद्र (आप्पा) चांदणे व सौ. वैष्णवी मंगेश चांदणे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.