"शिक्षकांचे राज्य पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण व ग्राम विकास मंत्री यांची भेट घेणार - माजी मंत्री श्री. हर्षवर्धनजी पाटील"
इंदापूर ( वार्ताहर):
शिक्षकांचे राज्य पातळीवरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण व ग्राम विकास मंत्री यांची भेट घेणार असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करतेवेळी आज सांगितले.
दुधगंगा संघ इंदापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा- इंदापूर नूतन कार्यकारिणीचा सत्कार माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी श्री. पाटील यांचेकडे शिक्षकांचे राज्य व जिल्हास्तरीय विविध प्रलंबित मागण्या व प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी श्री.पाटील म्हणाले की, "जुनी पेन्शन लागू करणे , वेतन त्रुटी दुर करणे , विद्यार्थी गणवेश लवकर मिळावे ,रखडलेली प्रमोशन तात्काळ करावी , बदल्या कराव्यात " असे विविध प्रश्न मंत्रालय पातळीवर शिक्षण मंत्री मा.श्री. दिपक केसरकर, ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीश महाजन यांचे बरोबर बैठक लावून सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. यावेळी शिक्षक समिती जिल्हा अध्यक्ष सुनील वाघ यांनी प्रास्ताविक केले. नुतन अध्यक्ष सुनील शिंदे , उपाध्यक्ष लतिफ तांबोळी , कार्याध्यक्ष विजय पाटील , कोषाध्यक्ष दत्तात्रय लकडे , सरचिटणीस विनय मखरे , संपर्क प्रमुख देवानंद जमदाडे , प्रवक्ते संतोष हेगडे यांचे सत्कार करण्यात आले. नितीन वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हरिश काळेल , विलास शिंदे , शहाजी पोफळे , मोहन भगत , बापू आदलिंग , विकास घुगे , भालचंद्र भोसले , सतिष खटके , अरूण मिरगणे , वसंत फलफले ,सर्जेराव खुसपे , प्रमोद कुदळे , भारत गायकवाड , मैनुद्दीन मोमीन , सचिन वेदपाठक , रविंद्र तनपुरे , अमोल बोराटे , सागर भोसले , सचिन कोळी , अभिजीत मखरे उपस्थित होते.संतोष हेगडे यांनी सुत्रसंचालन केले व छगन मुलाणी यांनी आभार मानले.