"सेट परीक्षेचा निकाल जाहीर: 7273 विद्यार्थी उत्तीर्ण "

पुणे:
              सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता हा निकाल विद्यापीठाच्या खालील  संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. 

         या परीक्षेची अंतिम उत्तर तालिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे . तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच त्यांचे सेट प्रमाणपत्र वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.
         सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्य पात्रता परीक्षा सेट विभागाच्या वतीने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 17 शहरांमधील विविध महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा 39 वी सेट परीक्षा होती. या परीक्षेत महाराष्ट्र आणि गोव्यातील 1 लाख 9250 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांपैकी 7273 विद्यार्थी पात्र ठरले असून 6.66% निकाल लागला आहे.


Popular posts from this blog

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "