"श्री. बाबीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना 3900 वह्यांचे वाटप"
रुई ( वार्ताहर):
दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी श्री. बाबीर विद्यालयातील 650 विध्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्या अश्या प्रकारे एकूण 3900 वह्यांचे वाटप कारण्यात आले.बारामती कॅटल फिड्स आणि इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मदत व प्रोत्साहन भेटत असते. या पुढे ही अश्या प्रकारच्या विविध उपक्रमाांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळो वेळी मदत करण्याचे आश्वासन श्री. रामदास मेटकरी साहेबांनी व वैभव पाटील यांनी दिले.
यावेळी बारामती कॅटल फिड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर श्री. रामदास मेटकरी , श्री. मनोहर भोंडवे ,श्री. विक्रम गलांडे तसेच इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेडचे संचालक श्री. वैभव पाटील, श्री. आमतसिंह आत्माराम पाटील, श्री. बबन दादा मारकड , माजी सरपंच श्री. तानाजी दादा मारकड हे मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर तालुका ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेडचे सी. ई. ओ. श्री. सौरभ पोटफोडे तसेच बारामती कॅटल फिड्सचे जनरल मॅनेजर श्री.अजय पिसाळ साहेब व श्री.विनोद वसेकर साहेब (A.S.M ) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
विद्यालयातील शिक्षक श्री.पाटील सर यांनी आभार मानून या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.