"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"


पिंपळगाव बसवंत (वार्ताहर):-
                 वर्तुळाचा घेर शोधणे, वर्तुळाचे क्षेत्रफळ शोधणे, विविध गोलाकार वस्तूंचे क्षेत्रफळ शोधणे, नदीच्या प्रवाहाची लांबी शोधण्यासाठी, पृथ्वीचा आकार निश्चित करणे, ताऱ्यांमधील अंतर शोधण्यासाठी पाय या संख्येचा उपयोग होतो असे मत प्रा.तुषार खैरनार यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात गणित विभाग आयोजित पाय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, भागवतबाबा बोरस्ते, पोलीस निरीक्षक तिवारी, श्रीमती शोभाताई बोरस्ते, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, भारताला गणित विषयात
 संशोधन करण्यास मोठा वाव असून विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेऊन संशोधनात गती प्राप्त करावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे यांनी करून पाय या दिवशाचे महत्व सांगितले.
 यावेळी , गणित विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या संशोधनावर आधारित प्रकल्पाचे सदरिकरण देण्यात आले होते. 40 विद्यार्थ्यांनी वेगवेगळे संस्थान प्रकल्प सादर केले तसेच पहिल्या तीन संस्थान प्रकल्पांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता खकाळे,पाहुण्यांचा परिचय प्रा. कल्याणी आहेर यांनी करून दिला तर आभार प्रा.निकीता घुमरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. सविता खकाळे, प्रा.प्राजक्ता देवरे, प्रा.कल्याणी आहेर, प्रा.निकीता घुमरे , प्रा.अर्चना गांगुर्डे, बाळा गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विज्ञान शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

क. का. वाघ महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथे पाय दिन कार्यक्रमात उपस्थित मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, भागवतबाबा बोरस्ते, पोलीस निरीक्षक तिवारी, श्रीमती शोभाताई बोरस्ते,प्रा.तुषार खैरनार, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे, प्रा. सविता खकाळे आदी.

Popular posts from this blog

"प्रबोधनदूत योजनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी श्री.योगेश आदलिंग यांची निवड"

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"