केडगांव ( वार्ताहर): केडगांव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. 12 ऑगस्ट रोजी भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये इस्रोसंबंधीच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. याप्रसंगी प्राचार्य नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की , भारतीय अंतराळ संशोधन केंद्राचा विकास ज्या पद्धतीने झाला, त्यामध्ये विक्रम साराभाई यांनी पायाभूत योगदान दिले. विद्यार्थ्यांनी भारतीय संशोधकांचा आदर्श घेऊन संशोधन क्षेत्रात आपले सक्रिय योगदान दिले पाहिजे. महाविद्यालयामधील रसायनशास्त्र विभागाद्वारे 2 ऑगस्ट रोजी भारतीय औषध निर्मिती शास्त्राचे जनक सर प्रफुलचंद्र रे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुद्धा कार्यक्रमाचे अध्यक्...
पिंपळगाव बसवंत (वार्ताहर):- वर्तुळाचा घेर शोधणे, वर्तुळाचे क्षेत्रफळ शोधणे, विविध गोलाकार वस्तूंचे क्षेत्रफळ शोधणे, नदीच्या प्रवाहाची लांबी शोधण्यासाठी, पृथ्वीचा आकार निश्चित करणे, ताऱ्यांमधील अंतर शोधण्यासाठी पाय या संख्येचा उपयोग होतो असे मत प्रा.तुषार खैरनार यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात गणित विभाग आयोजित पाय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, भागवतबाबा बोरस्ते, पोलीस निरीक्षक तिवारी, श्रीमती शोभाताई बोरस्ते, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, भारताला गणित विषयात संशोधन करण्यास मोठा वाव असून विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेऊन संशोधनात गती प्राप्त करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे यांनी करून पाय या दिवशाचे महत्व सांगितले. यावेळ...
# लोक_माझे_सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर यांचा शनिवार दि २८ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सकाळी १० ते दु २ वा पर्यंत सर्वांसाठी मोफत सर्वरोगनिदान शिबीराचे रक्तदान शिबिराचे आणि क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे यानिमित्त बाळासाहेब क्षिरसागर यांच्या राजकिय सामाजिक कार्यावर टाकलेला प्रकाशझोत .. निफाड तालुक्याच्या राजकारणात लोकनेते स्व आर डी आप्पा क्षिरसागर यांनी वेगळा दबदबा निर्माण केलेला होता जिल्हा भुविकास बँकेच्या माध्यामातुन जिल्हाभरात शेतकर्यांच्या घामाला आधार दिला पुढील काळात बाळासाहेब क्षीरसागरांना राजकिय सामाजिक वारसा मिळाला असल्याने सर्वच क्षेत्रातील नागरिकांशि बाळासाहेबांचा संबंध येत गेला महाविद्यालयीन शिक्षण पिंपळगाव बसवंतला पुर्ण केल्यावर बाळासाहेब द्राक्ष शेतीत रममाण झाले होते नवनवि...