" श्री. केतकेश्वर विद्यालयात वृक्षारोपणासोबतच शालेय साहित्य वाटपातून रुजले डॉ.बाबासाहेबांचे विचार "
निमगांव केतकी ( वार्ताहर) :
श्री. केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,नि.के. येथे समीक्षा बहुउद्देशिय विकास संस्था,इंदापूर व भारतीय बौद्धजन विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 101 वृक्षांचे रोपण व इयत्ता 5 वी ते 10 वी मधील गरीब,गरजू व होतकरू 86 विद्यार्थ्यांना 510 वहयांचे वाटप आज सोमवार दि. 15/07/24 रोजी करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या संदेशातून प्रेरणा घेऊन पहिला शिक्षणाचा टप्पा हा तळागाळातून पार पडावा या विचारातून वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भारतीय बौद्धजन विकास समितीचे सदस्य यांनी संस्थेच्या कार्याविषयी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योग्य मार्गदर्शन केले.
यावेळी समीक्षा बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिणी दादा राऊत यांनी इंदापूर तालुक्यातील विविध शाळा तसेच इंदापूर महावितरण विभागाच्या विविध केंद्रामध्ये आजपर्यंत शेकडो वृक्षांचे रोपण तसेच वाचनालय, 2 ते 5 वमोगटातील विद्यार्थ्यांसाठी बालसंसंकार वर्ग चालू असल्याची, शालेय साहित्य वाटप तसेच इतर सामाजोपयोगी उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. भोंग एम्.बी.यांनी आभार प्रदर्शनामध्ये दोन्ही संस्थेच्या व्यापक समाजकार्याविषयी भरभरून कौतुक केले व आभार मानले. तसेच शालेय साहित्य वाटप झाल्यानंतर सर्वच महापुरुषांविषयी जोरदार घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली व वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्धजन विकास समितीचे - प्रदीप पवार, मिलीद जाधव, सुभाष नाथभजन, सारंग नाईक, समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्थेचे रोहिणी राऊत, दादा राऊत, विशाल शहाने, आकाश झगडे, कुमारी समीक्षा राऊत व विद्यालयाचे उपप्राचार्य एम. बी. भोंग सर, श्री. योगेश आदलिंग सर, श्री. के. डी भोंग सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दादा राऊत याांनी तर सूत्रसंचालन के.डी.भोंग यांनी केले.