Posts

Showing posts from July, 2023

" प्रात्यक्षिकातून दिले जात आहेत गणिताचे धडे - नंदिकेश्वर प्रगती विद्यालयाचा अभिनव उपक्रम "

Image
सराफवाडी ( वार्ताहर):       इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी शाळेमध्ये नेहमीच विविध अभिनव उपक्रम राबवले जातात. गणितासारख्या विषयातील काही भौमितिक भागांचे विद्यार्थ्यांना सहजरीत्या आकलन व्हावे म्हणून गणित शिक्षक श्री.नलवडे आर.एन. यांनी याकरता एक अभिनव संकल्पना अमलात आणली. त्यांनी शाळेच्या मैदानावरती विद्यार्थ्यांना भौमितिक संकल्पना समजावून दिल्या . त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कोणतेही दडपण न येता संकल्पना उत्तमरित्या समजून हसत खेळत शिक्षण पार पडले.  संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा नेहमीच वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असते. या प्रात्यक्षिकावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिंगाडे जे.एन.,श्री.काळेल ए.के.,विज्ञान शिक्षिका श्रीमती बरळ जे.एम.,श्रीमती पाकले एस.बी. हे उपस्थित होते.

" गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणे गरजेचे " - डॉ.श्रीराम गीत

Image
पुणे ( वार्ताहर):                  "दहावी बारावीचा टप्पा पार करून करिअरमध्ये यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांनी इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणे गरजेचे आहे " ,असे उद्गार सुप्रसिद्ध करियर कौन्सिलर डॉ. श्रीराम गीत यांनी काढले.             जागृती महिला व बालकल्याण संस्थेने आयोजित केलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात उपस्थित विद्यार्थी व पालकांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. दहावी, बारावीच्या वळणावरून आपल्या करिअरच्या वाटेवर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झाला, तरी त्यांनी आपल्या अवतीभवती जिथे कुठे विद्यार्थ्यांसाठी मदतीची गरज भासेल तिथे आवश्यक मदत करावी असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावीतील 80% च्या वर मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.      ...

"ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा"

Image
शिरवळ (वार्ताहर):              ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय , शिरवळ येथे बुधवार दिनांक १९/ ७ /२०२३ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शाळेतील मल्टीस्किल अभ्यासक्रमाच्या चारही विभागाशी सबंधित विद्यार्थांच्याकडून रांगोळी काढण्यात आली तसेच विभागात बनवण्यात आलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेतील इतर विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते . शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्टीस्कील विभागात बनवलेल्या वस्तूंची पाहणी केली.              जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी औरा लेझर कंपनीचे सिनिअर इंजिनिअर मा.साहिल आतार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . आतार सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्त्न करावेत . वेळीच निर्माण होणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहाय्याने सोडवाव्यात म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येईल.    ...

" श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात प्लास्टिक मुक्ती अभियान "

Image
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :         'वसुधैव कुटुम्बकम्' या विचारांचा वारसा सांगणारी आपली भारतीय संस्कृती विश्व कल्याणासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे, याच विश्व कल्याणासाठी, वसुंधरेच्या संवर्धनासाठी अत्यंत धोकादायक असणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करून पुन्हा एकदा पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 'प्लास्टिक मुक्ती ही काळाची गरज आहे ' त्यामुळे येथील श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित प्लास्टिक मुक्त अभियानात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.   या अभियाना अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त परिसर करण्यासाठी संकल्प केला असून आठवडाभरात घर,शाळा परिसरात असलेले टाकावू प्लास्टिक दर शनिवारी  विद्यालयात जमा करून नंतर ते नगर परिषद अंबाजोगाई येथे जमा केले जाणार आहे.आज विद्यालयात विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक बॉटल मध्ये जमा करून दिले. या उपक्रमाचे प्रमुख व प्रबोधन दूत श्रीकांत देशपांडे काम पहात आहेत विद्यालयात मा मुख्याध्यापक श्री बाबुराव आडे सरांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षक म्हणून काम करताना वृक्षारोपण करून वृक्ष जगवण्याचे कार्य सातत्याने करावे तसेच पर्यावरणाला ...