"तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान"

बारामती ( वार्ताहर) : दि.२७ डिसेंबर तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे दि.२७ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अंतर्गत अर्थशास्त्र विभागाच्या वतीने "अर्थशास्त्रातील रोजगार संधी" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्या प्रतिष्ठानचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,सुपे येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.अमर नांदगुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्थशास्त्र विषयातुन पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, सहकार, बँकिंग आणि वित्तीय सेवा ,वित्तीय पत्रकारीता,संशोधन,स्पर्धा परीक्षा,आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था,इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा.नांदगुडे यांनी सांगितले.अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी अनुषंगिक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. ...