Posts

Showing posts from July, 2024

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

Image
पिंपळगाव बसवंत (वार्ताहर):-                  वर्तुळाचा घेर शोधणे, वर्तुळाचे क्षेत्रफळ शोधणे, विविध गोलाकार वस्तूंचे क्षेत्रफळ शोधणे, नदीच्या प्रवाहाची लांबी शोधण्यासाठी, पृथ्वीचा आकार निश्चित करणे, ताऱ्यांमधील अंतर शोधण्यासाठी पाय या संख्येचा उपयोग होतो असे मत प्रा.तुषार खैरनार यांनी व्यक्त केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात गणित विभाग आयोजित पाय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, भागवतबाबा बोरस्ते, पोलीस निरीक्षक तिवारी, श्रीमती शोभाताई बोरस्ते, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे म्हणाले की, भारताला गणित विषयात  संशोधन करण्यास मोठा वाव असून विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घेऊन संशोधनात गती प्राप्त करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्रा. सचिन कुशारे यांनी करून पाय या दिवशाचे महत्व सांगितले.  यावेळ...

" काव्यमंच : वारीची आस "

Image
आज आषाढी एकादशी. या निमित्ताने कवी साहेबराव शिंदे यांची 'वारीची आस' ही कविता खास विश्वदीप न्यूजच्या वाचकांसाठी...

" श्री. केतकेश्वर वि‌द्यालयात वृक्षारोपणासोबतच शालेय साहित्य वाटपातून रुजले डॉ.बाबासाहेबांचे विचार "

Image
निमगांव केतकी ( वार्ताहर) :        श्री. केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,नि.के. येथे समीक्षा बहुउद्देशिय विकास संस्था,इंदापूर व भारतीय बौद्‌धजन विकास समिती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 101 वृक्षांचे रोपण व इयत्ता 5 वी ते 10 वी मधील गरीब,गरजू व होतकरू 86 विद्यार्थ्यांना 510 वहयांचे वाटप आज सोमवार दि. 15/07/24 रोजी करण्यात आले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या संदेशातून प्रेरणा घेऊन पहिला शिक्षणाचा टप्पा हा तळागाळातून पार पडावा या विचारातून वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भारतीय बौद्धजन विकास समितीचे सदस्य यांनी संस्थेच्या कार्याविषयी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योग्य मार्गदर्शन केले.         यावेळी समीक्षा बहुउद्दे‌शिय संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिणी दादा राऊत यांनी इंदापूर तालुक्यातील विविध शाळा तसेच इंदापूर महावितरण विभागाच्या विविध केंद्रामध्ये आजपर्यंत शेकडो वृक्षांचे रोपण तसेच वाचनालय, 2 ते 5 वमोगटातील विद्यार्थ्यांसाठी बालसंसं...