"माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी येथे विविध स्पर्धा व उपक्रम संपन्न"
सराफवाडी ( वार्ताहर) : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नंदिकेश्वर प्रगती विद्यालय,सराफवाडी या विद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपण ,रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वनौषधी वनस्पती यांचे प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. नारायणदास रामदास हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,इंदापूरचे प्राचार्य सन्माननीय श्री.सोरटे सर यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले विद्यालय,बिजवडी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री. फलफले सर यांनी आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय कदम सर यांनी केले.त्यांनी यावेळी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. जगदाळे सर यांनी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा जी...