Posts
Showing posts from November, 2023
'ॲमेझिंग २०००' स्नेहसंमेलनाचे दि.१९ नोव्हेंबर रोजी आयोजन
- Get link
- X
- Other Apps
निमगांव केतकी (वार्ताहर): आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी,तसेच ते शालेय जीवनातील सुंदर असे दिवस पुन्हा जगण्यासाठी निमगांव केतकी येथील श्री केतकेश्वर विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन २००० या बॅचचे विद्यार्थी पुन्हा एकदा तब्बल २३ वर्षानंतर एकत्र येत आहेत. या बॅचच्या संयोजन समितीने यासाठी ' ॲमेझिंग २०००' या स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले आहे . विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनाला उजाळा देण्याची संधी या निमित्ताने प्राप्त होत आहे. तरी इयत्ता १० वीच्या सन २००० या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी १९ नोव्हेंबरला अगदी न विसरता येऊन पुन्हा एकदा शालेय आठवणीत रमण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.हा समारंभ इंदापूर येथील राधिका हॉल या ठिकाणी रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी सकाळी ठीक आठ वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी श्री केतकेश्वर विद्यालयाच्या पटांगणात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
" सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयात भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धेला उदंड प्रतिसाद "
- Get link
- X
- Other Apps
केडगाव ( वार्ताहर) : केडगांव (ता.दौंड) येथील सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाने भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेच्या उदघाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदकुमार जाधव उपस्थित होते.प्राचार्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील संकल्पना अवगत होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची खोली वाढविण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.या उपक्रमात वाणिज्य आणि बी.ए. व एम.ए.अर्थशास्त्र विभागातील 150 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.तन्वीर शेख,मराठी विभागप्रमुख डॉ.बी.डी.गव्हाणे, कला शाखाप्रमुख डॉ.अनुराधा गुजर, भूगोल विभागप्रमुख डॉ.अशोक दिवेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.भाऊसाहेब दरेकर,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.महादेव थोपटे डॉ. शोभा वाईकर,ग्रंथपाल डॉ.मनीषा जाधव,विज्ञान शाखाप्रमुख प्रा.अरविंद मिंधे इ.मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.भाऊसाहेब दरेकर, डॉ.बी.डी. गव्हाणे, प्रा.शुभम त