Posts

Showing posts from September, 2021

" विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची कोरोनाकाळातील शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद : प्रा.विशाल कोरे "

Image
इंदापूर (प्रतिनिधी):         विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने कोरोनाच्या या काळामध्ये राबविलेले विविध शैक्षणिक उपक्रम उल्लेखनीय असून महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार विद्या प्रतिष्ठान संस्थेचे मुख्य ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.विशाल कोरे यांनी काढले. महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट तसेच उद्योजकता विकास यासंबंधी संस्थेतर्फे आगामी काळामध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्याकरिता आज त्यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली होती. महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.     प्राचार्य डॉ.साहूजी यांनी यावेळी महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयीचे सादरीकरण केले, तसेच महाविद्यालयाच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.तमन्ना शेख यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे सादरीकरण केले.       प्रा. विशाल कोरे यांनी यावेळी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सेंट्रल ट्रेनिंग...

" इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा प्लेसमेंटमध्ये चढता आलेख "

इंदापूर (प्रतिनिधी):               इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अगोदरच प्लेसमेंटमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमध्ये नव्याने काही विद्यार्थ्यांनी भर टाकली असून त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात अजून वाढ झालेली आहे. बी.एस्सी.(संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा नवगिरे हिची 'मेकॅट्रॉनिक्स सिस्टिम्स प्रा.लि.' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'सॉफ्टवेअर इंजिनीअर' या पदावर , बी.सी.ए. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रथमेश पवार याची 'क्लोव्हर इन्फोटेक' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'सिनियर इंजिनियर -टेक्निकल सपोर्ट'  या पदावर, बी.एस्सी. (संगणकशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी याची 'टी सिस्टिम्स' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 'असोसिएट कन्सल्टंट' या पदावर ट्रेनी म्हणून, तर बी.सी.ए. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शाहबाज मुलाणी याची 'पेगासस इन्फोकाॅर्प ' या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ' प्रॉडक्शन सपोर्ट इंजिनीअर' या पदावर  प्लेसमेंटद्वारे निवड झालेली आहे.         ...