"ऋषिकेशची कलाक्षेत्रातील वाटचाल ही इंदापूरकरांसाठी आणि विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब- प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी"

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर (जि.पुणे) येथील उदयोन्मुख अभिनेता आणि विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश काळे याने अभिनय केलेल्या "गाडी घुंगराची" या मराठी गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या गाण्याला युट्युबवर एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून महाराष्ट्रभर तरुण वर्गामध्ये हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. ऋषिकेशच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानच्या इंदापूर येथील वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.निर्मल साहूजी म्हणाले की, इंदापूरसारख्या ग्रामीण भागात राहून सुद्धा ऋषिकेशने कला क्षेत्रात केलेली ही वाटचाल खरंच कौतुकास्पद आहे.त्याने मिळवलेले हे यश आमच्या महाविद्यालयाच्या तसेच इंदापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची बाब आहे. या सत्कारप्रसंगी ऋषिकेशने आपले मनोगत व्...