" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची भविष्यवेधी वाटचाल कौतुकास्पद: उपशिक्षणाधिकारी मा.श्री. हेमंतकुमार खाडे "
शिरवळ( वार्ताहर):- शिरवळ येथील ज्ञानसंवर्धिनी प्रशालेने स्टेम (STEM) प्रयोगशाळेची केलेली उभारणी म्हणजे शाळेची भविष्यातील आव्हाने विचारात घेऊन केलेली कौतुकास्पद वाटचाल असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी मा.श्री. हेमंतकुमार खाडे यांनी केले. प्रशालेने उभारलेल्या या प्रयोगशाळेची पाहणी त्यांनी केली व उपस्थित विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या कौशल्यांची चाचपणी केली. यावेळी ते म्हणाले की, 'या स्टेम प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान,तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित यासंबंधीच्या संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे पडताळणी करण्याची संधी मिळते.तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग यांसारख्या विषयांची ओळख विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच करून देण्याचे महत्त्वाचे कार्य या स्टेम प्रयोगशाळांमुळे घडत आहे.' खंडाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.गजानन आडे यांनी प्रशाला राबवत असलेल्या विविध उपक्रमांची यावेळी प्रशंसा केली. कांचन ननावरे मॅडम यांनी देखील प...