Posts

Showing posts from December, 2024

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "

Image
# लोक_माझे_सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर      नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आणि लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर यांचा शनिवार दि २८ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सकाळी १० ते दु २ वा पर्यंत सर्वांसाठी मोफत सर्वरोगनिदान शिबीराचे रक्तदान शिबिराचे आणि क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे यानिमित्त बाळासाहेब क्षिरसागर यांच्या राजकिय सामाजिक कार्यावर टाकलेला प्रकाशझोत ..      निफाड तालुक्याच्या राजकारणात लोकनेते स्व आर डी आप्पा क्षिरसागर यांनी वेगळा दबदबा निर्माण केलेला होता जिल्हा भुविकास बँकेच्या माध्यामातुन जिल्हाभरात शेतकर्यांच्या घामाला आधार दिला पुढील काळात बाळासाहेब क्षीरसागरांना राजकिय सामाजिक वारसा मिळाला असल्याने सर्वच क्षेत्रातील नागरिकांशि बाळासाहेबांचा संबंध येत गेला  महाविद्यालयीन शिक्षण पिंपळगाव बसवंतला पुर्ण केल्यावर बाळासाहेब द्राक्ष शेतीत रममाण झाले होते नवनवि...