Posts

Showing posts from June, 2023

"छत्रपती महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा"

Image
भवानीनगर( प्रतिनिधी):                     आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज 21जून रोजी भवानीनगर येथील श्री छत्रपती कला, वाणिज्य महाविद्यालयात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ त्यांच्या वतीने  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.            कार्यक्रमाचे प्रस्ताविक  उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.धुळदेव वाघमोडे यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके विदर्थ्यांकडून करून घेतली.                          महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी योग दिनाचे महत्व सांगताना म्हटले कि, प्राचीन काळापासून योगा भारतामध्ये केला जातो. भारताने जगाला योगाच्या माध्यमातून मोठी देणगी दिली आहे.आरोग्यदायी व आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास योगा व ध्यानधारणा करणं गरजेचं आहे. आजच्या धकाधकी व ताणतणावाच्या युगात आरोग्य आणि आयुर्मान वृद्धिंगत जर क...