Posts

Showing posts from January, 2023

"विद्या प्रतिष्ठानच्या सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर नारोळी येथे संपन्न"

Image
सुपे (वार्ताहर) :       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्या प्रतिष्ठानचे सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे नारोळी ता.बारामती येथे २ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.२ जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन झाले.उद्घाटन प्रसंगी नारोळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. मोनाली भंडलकर,पोलीस पाटील सौ.सुजाता ढमे,उपसरपंच दत्तात्रय ढमे, ग्रामसेविका दिपाली हिरवे,न्यू इंग्लिश स्कूल नारोळीचे मुख्याध्यापक हनुमंत ढमे, महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय शिंदे,प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.दीपक लोणकर, प्रा.अजिंक्य वाबळे, ज्ञानदेव सोनवणे ,प्राध्यापिका आरती वाबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.       या शिबिरांतर्गत स्वयंसेवकांनी बेटी बचाओ बेटी पढाओ,मतदान हक्क, बालविवाह प्रतिबंध,स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध या विषयांवर  पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.तसेच वृक्ष संवर्धन,ग्रामस्वच्छता,प्लास्टिक संकलन,शेतकऱ्यांसाठी ई पिक पाहणी, हिमोग्लोबिन तप...