" ख्यातनाम लोककला संशोधक डॉ.गणेश चंदनशिवे यांचे राष्ट्रीय नाटय विद्यालयात तमाशा प्रशिक्षण "
नवी दिल्ली ( प्रतिनिधी) :- आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे हे भारतातील नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण देणारी सर्वोच्च संस्था अर्थातच दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (NSD ) विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा अस्सल रांगडा तमाशा शिकवणार आहेत. आज पारंपरिक तमाशाला कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कधी पावसाच्या सावटाचा ,कधी यात्रा जत्रातील परवानगीचा तर कधी आचार संहितेचा .अशा प्रतिकूल परिस्थितीतही तमाशा टिकून आहे आपले पारंपरिक अस्तित्व घेऊन. अशा प्रतिकूल परिस्थित भारतातील इतर लोककलावंत आपल्या राज्यातील लोककला इतर राज्यात पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जसा गुजरातचा भवाई ,उत्तर प्रदेशची नौटंकी ,ओरिसाचा छाऊ ,प. बंगालचा बाऊल ,छत्तीसगडची पांडवणी तशीच महाराष्ट्राची अस्सल रांगडी लोककला तमाशा .आता महिनाभर या भारतभरातील मुलांना तमाशाचा इतिहास ,त्याची जडण घडण ,त्यातील कलावंतांचे योगदान ,त्यातील घटक ,तमाशाचे पूर्ववैभव ,आजच्या काळातील तमाशाची अवस्था आणि त्याचे सादरीकरण याचे प्रशिक्षण डॉ. गणेश चंदनशिवे अमराठी मुलांना दे