‘अक्षर मानव’चा मधुमक्षिका जीवनगौरव पुरस्कार डॉ. र. पु. फडके यांना, तर ‘मधुमक्षिका जीवनसन्मान पुरस्कार’ डॉ. क. कृ. क्षीरसागर यांना प्रदान

पुणे, दि. २६ - जागतिक मधुमक्षिका पालन दिनानिमित्त 'अक्षर मानव' या सामाजिक संस्थेतर्फे मधुमक्षिकापालन क्षेत्रातील आशिया खंडातील एकमेव संस्था उभी करण्यात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डॉ.र.पु. फडके यांचा ‘मधुमक्षिका जीवन गौरव पुरस्कारा’ने तर ‘मधुमक्षिका जीवनसन्मान पुरस्कारा’ने मधमाश्यांचा प्रचार, प्रसार आणि संशोधनात भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. क. कृ. क्षीरसागर यांचा नुकताच गौरव करण्यात आला. रविवारी इंद्रधनुष्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. आर.आर. केडगे आणि प्रगतिशील शेतकरी व उद्योजक श्री.बच्चे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी अक्षर मानव मधुमक्षिकापालन विभागाचे राज्यप्रमुख प्रशांत सावंत, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश इंदापूरकर, प्रा. प्रवीण जावळे आणि अक्षर मानव प्रशासन विभागप्रमुख सचिन पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.प्रवीण जावळे यांनी अक्षर मानवची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात ‘मधमाशीपालनातील पुढील दिशा’ या विषयावर मान्यवरांनी मतं व्यक्त केली. तसेच मधमाशीपालनाचं महत्त्वही मान्यवरांनी उलगडून सांगितले. मधमाशीपालनात अधि...