"भोंग प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम: विविध क्षेत्रांतील गुणवंताचा सत्कार संपन्न"

निमगांव केतकी (प्रतिनिधी) : संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे भोंग प्रतिष्ठानच्या वतीने भोंग परिवारातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी धनश्री भोंग हीने अभंग म्हणून उपस्थितांची मने जिंकली. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानपञ देवून विजय उत्तम भोंग, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपञाचे वाचन राजकुमार भोंग यांनी केले. त्याचबरोबर मीना भोंग उपसरपंच निमगाव केतकी, मच्छिंद्र भोंग उपसरपंच शेळगाव, सुधाकर भोंग हिंदी भाषारत्न पुरस्कार, सेट परीक्षा उत्तीर्ण वर्षा भोंग व अश्विनी भोंग, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेले श्रेयशी भोंग, अर्णव भोंग, सातारा सैनिक स्कूल प्रवेश म...